
नवी दिल्ली : व्हि४०युई हा सर्वात स्वस्त असणारा स्मार्टफोन आपल्या ग्राहकांसाठी नुकताच भारतातील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स कंपनी व्हिडिओकॉनने लाँच केला आहे. ग्रे, ब्लॅक आणि व्हाइट या आकर्षक रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार असून ग्राहक हा स्मार्टफोन शॉपक्लूज या संकेतस्थळावरुन खरेदी करु शकतात.
व्हिडिओकॉनचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच
असा आहे व्हिडीओकॉनचा नवा स्मार्टफोन – याचा डिस्प्ले ४ इंचाचा FWVGA आणि ८००x४८० पिक्सल रिझोल्यूशनचा असून याचा प्रोसेसर १.३ GHz क्वॉड-कोरचा आहे. यात अँड्राइड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. यात ५१२ एमबी रॅम आणि ८ जीबी रोम देण्यात आला आहे तर रिअर कॅमेरा ३.२ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत ३७९९ रुपये एवढी आहे.
