
मुंबईः आयफोनचे चाहते मागील अनेक दिवसांपासून अॅपलच्या आयफोन ७ची वाट बघत आहेत. हा स्मार्टफोन येण्याआधीपासूनच याची जोरदार चर्चा रंगली असून यात कोणते फिचर्स असतील याची उत्सुकता आणि चर्चाही सुरू आहे. आयफोन ७ चे फिचर्स काही दिवसांपूर्वी लीक झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या बातम्यांनुसार अनेक नवे बदल आयफोन ७ मध्ये बघायला मिळणार आहेत. आधीच्या आयफोनपेक्षा हा आयफोन खूप वेगळा आणि अधिक आकर्षक असल्याचे बोलले जात आहे.
आता निळ्या रंगात नवा आयफोन!
याबाबत एका टेक्नॉलॉजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आता आयफोन ७ चे क्लिकेबल होम बटन आता हद्दपार होणार असून त्याऐवजी टच बटन येणार आहे. आयफोन ७ हा तब्बल २५६जीबी रॅमसह येणार अशीही चर्चा असल्यामुळे आयफोन ७ बद्दल आयफोन चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. तर टच बटन असणारा हा फोन कसा कसा असेल याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. अॅपलच्या आयफोनचे जगभरात लाखो-करोडो चाहते असल्यामुळे कंपनी आपल्या चाहत्यांना नेहमीच काहीतरी वेगळ देण्याचा प्रयत्न करीत असते. आयफोन ७ ची सारेजण वाट पाहत आहे.
स्पेस ग्रे हा रंग आयफोनची खरी ओळख पण आता हाच रंग हद्दपार होणार आहे. त्याऐवजी निळ्या रंगात आयफोन ७ पाहायला मिळण्याची शक्यता असून आपल्या डिझाइनमध्येही आयफोन बदल करणार आहे. तसेच ड्यूल लेन्स कॅमेराही असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आयफोन ७ निळ्या रंगात येतो की आपल्या पूर्वीच्याच रंगामध्ये हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
