व्याघ्र दर्शनाची संधी देणार टायगर एक्स्प्रेस

tiger
पर्यटकांना अभयारण्ये आणि जंगलसफारी घडवून प्रत्यक्ष वाघांच्या दर्शनाची संधी रेल्वे विभागाकडून दिली गेली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कान्हा, बांधवगड अभयारण्याची सफर घडविणार्‍या टायगर एक्स्प्रेस या लग्झरी रेल्वेचे उद्घाटन केले आहे. दर महिन्याला ही ट्रेन नियमित स्वरूपात आक्टोबरपासून सुरू केली जाणार आहे. दिल्लीतील सफदरजंग स्टेशनवरून सुटणारी ही गाडी ५ दिवस व ६ रात्री च्या प्रवासात मध्यप्रदेशातील कान्हा, बांधवगड सोबत धुवाँधार धबधब्याचे दर्शनही पर्यटकांना घडविणार आहे. तिकीटाच्या पैशांत पर्यटकांची राहणे, निवास, जेवण, रस्त्यावरील भटकंती असा सगळा खर्च समाविष्ट आहे.

tiger1
ट्रायल ट्रेन सर्कीट वाघांचे संरक्षणसंदर्भात जागृतीसाठी चालविली जात असल्याचे सांगून प्रभू म्हणाले की याच धर्तीवर एलिफंट एक्स्प्रेस व डेझर्ट एक्स्प्रेस या गाड्याही लवकरच सुरू केल्या जाणार आहेत. कान्हा व बांधवगड अभयारण्यात पर्यटकांची मुक्कामाची व्यवस्था आहे. या जंगलात वाघ, हरिणे, बारशिंगे, बिबटे यांचे दर्शन पर्यटकांना होऊ शकेल. ही रेल्वे आयआरसीटीसी तर्फे चालविली जाणार आहे.

Leave a Comment