मेक इन इंडिया योजनेत देशी कंपन्यांना मिळणार प्राधान्य

make-in-india
नवी दिल्ली – आतापर्यंत विशेष असे यश वाजत गाजत सुरू करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेला मिळालेले नाही. मेक इन इंडियामध्ये विदेशी कंपन्यांना सरकार जास्त समावून घेत नसल्याचे यामागे प्रमुख कारण मानले जात आहे. मात्र भारतामध्ये आता विदेशी कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

मेक इन इंडियामध्ये आता सरकार भारतीय कंपन्यांना प्राधान्य देत आहे. म्हणजे ‘मेक इन इंडिया’ला ‘मेक बाय इंडिया’चे स्वरुप देण्यात येणार आहे. याबाबतच्या चर्चेला सहमती दर्शविण्यात आली आहे. याला आरएसएसची सहयोगी संघटना स्वदेशी जागरण मंचचे समर्थन मिळाले आहे. लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे.

उद्योगजगताने या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. योजना यशस्वी करणे असे झाल्यामुळे सुलभ होणार आहे. भारतीय कंपन्या पहिल्यापेक्षा अधिक योगदान असे होण्यामुळे देऊ शकणार आहेत, असे कुटीन आय मारबलचे एमडी राजीव अधलका यांनी म्हटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून एफडीआय म्हणजे विदेशी गुंतवणूक भारतात येण्यास मदत होणार आहे. व्यवसायामध्ये एफडीआय आणण्यासाठी विदेशी कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे.

Leave a Comment