
अॅपलने त्यांचे फोर एस व फाईव्ह सी हे आयफोन भारतीय बाजारातून काढून घेतले असून यापुढे हे फोन भारतीय बाजारात मिळू शकणार नाहीत. त्याचबरोबर २० हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीचे फोन भारतात न विकण्याचा निर्णयही अॅपलने घेतला असल्याचे समजते. आयफोनच्या लेटेस्ट डिव्हायसेसची विक्री वाढविण्यासाठी आणि कंपनीचा नफा वाढविण्यासाठी अॅपलने हा निर्णय घेतला असल्याचे अंतर्गत सूत्रांकडून समजते.
अॅपलने स्वस्त आयफोन बाजारातून मागे घेतले
मिळालेल्या माहितीनुसार अॅपलचा फोर एस १२ हजारांत तर फाईव्ह सी साधारण २० हजांर रूपयांत भारतात उपलब्ध झाल्याबरोबर या दोन्ही मॉडेल्सना प्रचंड मागणी येऊ लागली. भारतीयांनी या स्वस्त फोनवर अक्षरशः उड्या घेतल्याने अॅपलच्या फ्लॅगशीप मॉडेल्सना ग्राहक नाही अशी परिस्थिती आली. अॅपल सॅमसंग व चिनी स्मार्टफोनना मागे टाकू शकेल असे हे एकमेव क्षेत्र आहे मात्र स्वस्त फोनची वाढती मागणी हा अॅपलसाठी चिंतेचा विषय ठरला व त्यामुळे हे दोन्ही फोन भारतीय बाजारातून काढून घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यांची जागा आता आयफोन फाईव्ह एस घेणार आहे. या फोनची किंमत कमी करून तो भारतीय बाजारात येत आहे.
