
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफवर ८.८ टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली असून पीएफवर या आधी ८.७५ टक्के व्याज मिळत होते त्यात वाढ करण्यात आली आहे.
आता पीएफवर मिळणार ८.८ टक्के व्याज
२०१३ – २०१४ आणि २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात पीएफवर ८.७५ टक्के व्याज देण्यात आले. याचा लाभ ६ कोटींपेक्षा जास्त पीएफधारकांना मिळणार आहे. दरम्यान, पीएफवर ८.९५ टक्के व्याज देण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. मात्र, सध्या ८.७५ टक्के व्याजदर होता. २०१३ – २०१४ आणि २०१५-२०१६ या वर्षांसाठी व्याज दर वाढविण्याची शिफारस करण्यात आली होती.
