१४५ वर्ष जुन पत्र ऑस्ट्रेलियात सापडले

letter
सिडनी – १४५ वर्षांपूर्वी म्हणजेच (१८७०) पॅरिसमधून चार्ल्स मेस्मिअर यांनी आपल्या आईला एअर बलूनच्या सहाय्याने पाठवलेले पत्र ऑस्ट्रेलियामध्ये सापडले आहे. ऑस्ट्रेलियाने हे पत्र राष्ट्रीय संपत्ती संग्रहात जपून ठेवले आहे.

६ डिसेंबर १८७०मध्ये चार्ल्स मेस्मिअर यांनी आपल्या आईला लिहिलेल्या या पत्रात कुटुंबाच्या सुरक्षेची विचारपूस केली आहे. तसेच युद्ध आणि आपल्या परिस्थितीबद्दल माहितीदेखील दिली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हे पत्र कसे पोहोचले ? याचा नेमका शोध सुरु आहे. हे पत्र कोणीतरी लिलावात घेतले असावे आणि त्यांनी संग्रहालयात जमा केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पत्राचा ऑस्ट्रेलियाशी काही संबंध आहे का ? याची चाचपणी ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय संपत्ती विभाग करत आहे. तसेच सध्या ब्रिस्बेनमध्ये चार्ल्स मेस्मिअर यांचा कोणी वंशज स्थायिक आहे का ? याचादेखील तपास केला जातो आहे.

फ्रान्स व प्रशियन (रशिया) या दोन देशांत १८७० साली झालेल्या युद्धात फ्रान्सचा पराभव झाला होता. ज्यानंतर जर्मनीने पॅरिसला ४ महिन्यांहून अधिक काळासाठी वेढा घातला होता. यादरम्यान आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी इतर कोणतेच साधन नसल्याने एअर बलूनचा वापर केला जात होता.

यादरम्यान बलूनच्या सहाय्याने २० लाखांहून अधिक पत्र पाठवली गेली. ही पत्र छोट्या लिफाफ्यात पाठवली जायची जेणेकरुन जास्तीत जास्त पत्र पाठवता येतील. पत्र पाठवण्यासाठी कबुतरांचादेखील वापर केला जायचा जेणेकरुन कबुतरामार्फेत नातेवाईक पत्राच उत्तर पाठवू शकतील.

Leave a Comment