
चीनी स्मार्टफोन कंपनी फिकॉमने त्यांचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन एनर्जी ई ६७० भारतात लाँच केला आहे. हा बजेट फोन ५४९९ रूपयांत स्नॅपडीलवर मिळू शकणार आहे. काळा व पांढरा अशा दोन रंगात तो उपलब्ध आहे.
फिकॉमचा फोरजी एनर्जी ई ६७० भारतात लाँच
या फोनसाठी अँड्राईड ५.१ लॉलीपॉप ओएस, ५ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले, २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती ६४ जीबी पर्यंत मायक्रोकार्डच्या सहाय्याने वाढविण्याची सुविधा, ८ एमपीचा एलईडी फ्लॅशसह रियर कॅमेरा, ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा फोन फोरजी च्या दोन्ही बँडसना सपोर्ट करतो. तसेच थ्रीजी, जीपीआरएस, एज, वायफाय, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी अशी अन्य कनेक्टिव्हीटी ऑप्शन्सही दिली गेली आहेत.
