
जगातले नंबर वन सर्च इंजिन गुगलमध्ये माणसे आणि मशीन्स काम करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र येथे २०० बकर्या पगारी कामगार आहेत याची माहिती अनेकांना नसेल. या बकर्या दररोज कामावर येतात आणि त्या बदल्यात त्यांना जेवण आणि पगार दिला जातो.
गुगलमध्ये २०० पगारी बकर्या
या बकर्यांचे काम म्हणजे गुगल कार्यालयातील विशाल लॉनवर हिंडणे आणि तेथे असलेले लुसलुशीत गवत दिवसभर चरत राहणे हे आहे. या कामामुळे बकर्यांचे पोट भरते आणि कंपनीचा लॉन कापण्याचा खर्च वाचतो. शिवाय लॉन कापायच्या मशीनचा आवाज व धूर यामुळे कर्मचार्यांना होणारा त्रासही होत नाही. बकर्यांना चरविण्यसाठी येथे प्रशिक्षित मेंढपाळही ठेवले गेले आहेत.
अर्थात या कामासाठी बकर्यांना कामावर ठेवणारी गुगल ही पहिली कंपनी मात्र नाही. यापूर्वी याहूने २००० साली असेच त्यांच्या कंपनी आवारातील लॉन मेटनेन करण्यासाठी बकर्या तैनात केल्या होत्या.
