एचटीसी वन १० चे फिचर्स लिक

htc10
एचटीसी वन च्या नव्या फ्लॅगशीप स्मार्टफोनचे फिचर्स लीक झाले असून हा स्मार्टफोन बार्सिलोना येथे होणार्‍या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेसमध्ये लाँच केला जाईल अशी अटकळ बांधली जात आहे. अन्य कांही तज्ञांच्या मते या एमडब्ल्यूसी मध्ये सॅमसंग, श्याओमी, सोनी यांचे फ्लॅगशीप फोन लाँच होणार असल्याने एचटीसी त्यांचा वन १० हा नवा फोन मार्चच्या मध्यात लाँच करेल.

या फोनसाठी ५.१ इंची क्यूएचडी अमोलेड डिस्प्ले, अँड्राईड मार्शमेलो ६.०, ३२ जीबी इंटरनल मेमरी अ्रसेल. तसेच कॅमेर्‍यांसाठी विशेष ओळख असणार्‍या एचटीसीने या फोनसाठी अल्ट्रापिक्सल तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचेही सांगितले जात आहे. त्यानुसार फोनला १२ अल्ट्रापिक्सलचा कॅमेरा असेल. फोनचे होमबटण ओव्हल शेपचे असेल व त्यातच फिंगरप्रिट सेन्सर दिला जाईल. फोनच्या पुढच्या भागात कंपनीचा लोगो दिसणार नाही.

Leave a Comment