निसानच्या एक्स ट्रायलचे जॉनच्या हस्ते सादरीकरण

john
नवी दिल्ली – निसान कंपनीने भारतामधील ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमला आपला ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले असून त्याच्या हस्ते कंपनीने दिल्लीत सुरू असलेल्या ऑटो एक्सपोमध्ये निसान एक्स ट्रायल या कारचे लाँचिंग केले आहे.

जीटी आर स्पोर्ट्सकार आणि एक्स ट्रन हायब्रिड एसयुव्ही भारतीय बाजारपेठेत आणायचे कंपनीने ठरवले आहे. जॉन अब्राहम निसानच्या टीममध्ये आल्यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत. सर्वोत्तम दर्जा आणि स्टाइल या दोन्ही गोष्टी लक्षात ठेऊन आम्ही जॉन अब्राहमला ब्रॅंड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त करायचे ठरवले. अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

जॉन अब्राहम हा केवळ सुपरस्टारच नाही तर तो युथ आयकॉन देखील असल्यामुळे त्याचा विचार आम्ही केला असे कंपनीने म्हटले आहे. जॉन अब्राहमच्या बाइक आणि कार प्रेमाबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु आपल्या हस्ते जीटीआर या स्पोर्ट्सकारचे लाँचिंग होणार आहे म्हणून जॉन अब्राहम ‘एक्साइटेड’ आहे.

Leave a Comment