बंदही पडले देशातील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट

underwater
अहमदाबाद – मोठा गाजावाजा करुन सुरू करण्यात आलेले भारतातील पहिले अंडरवॉटर रेस्टॉरंट बंद करण्यात आले असून हे रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी न घेतल्यामुळे बंद करण्यात आले आहे. या रेस्टॉरंटचे मालक भारत भट यांनी रेस्टॉरंट सुरू करण्यापूर्वी आपण योग्य परवानगी घेतल्याचे म्हटले आहे.

१,६०,००० लीटर पाणी वापरुन अॅक्विरिअम तयार करण्यात आले आहे. जमिनीपासून वीस फूट खोल टॅंक बनवून हे रेस्टॉरंट तयार करण्यात आले आहे. या अॅक्वारिअममध्ये ४,००० प्रकारचे मासे टाकण्यात आले आहेत. अॅक्वारिअम लीक होत आहे असा प्रचार काही लोकांनी सुरू केल्यानंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले. दुबईतील एका रेस्टॉरंटपासून आपण प्रेरणा घेऊन हे रेस्टॉरंट सुरू केल्याचे भट यांनी म्हटले. सर्व परवानगी मिळाल्यावर हे रेस्टॉरंट पुन्हा सुरू होईल असा विश्वास भट यांनी व्यक्त केला.

Leave a Comment