
नवी दिल्ली- ग्रेटर नोएडामधील ऑटो एक्सपोमध्ये सुझुकीच्या बलेनो आणि इग्निस या दोन कार सादर करण्यात आल्या. इग्निसची किंमत ४ ते ६ लाख दरम्यान असणार आहे. ही कार ऑटो एक्सपोमध्ये सादर करण्यात आली असली तरी बाजारात ही कार ऑगस्टमध्ये उपलब्ध होणार आहे.
ऑटो एक्सपोमध्ये सुझुकीच्या बलेनो आणि इग्निस लाँच
ही कार स्मार्ट कॉम्पॅक्ट अर्बन व्हेइकल आहे. शहरातील ट्राफिक आणि पार्किंगसाठी लागणारी कमी जागा यासाठी ही कार अगदी योग्य आहे. पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही वर्जन्समध्ये ही कार बाजारात येणार आहे. ऑटोमॅटिक गियरबॉक्स हे या कारचे वैशिष्ट्य आहे.
सुझुकी बलेनो- आर. एस. सुझुकी बलेनो ही कारदेखील बजेट कारच्याच रेंजमध्ये असणारी कार आहे. या कारची किंमत पाच ते सात लाखादरम्यान असणार आहे. बॅलन्स सेफ्टी, फ्युल एफिशियन्सी आणि चालवण्याचा आनंद द्विगुणीत करणारे तंत्रज्ञान ही या कारची वैशिष्ट्ये आहेत.
