सचिनने बीएमडब्ल्यूची, तर विराटने ऑडीची कार केली लॉंच

expo
नवी दिल्ली- लोकांच्या लक्षात ऑटो एक्सपो २०१६ अनेक कारणांमुळे राहणारा इव्हेंट ठरत असून या प्रदर्शनात केवळ कारच नव्हे तर अनेक लक्षवेधी सेलिब्रिटींची उपस्थिती सर्वांवर मोहिनी घालत आहे.

नव्या ८० कार आणि बाइक्सचे ऑटो एक्सपोमध्ये लाँचिंग झाले. यापैकी सर्वात जास्त चर्चा झाली असेल तर सचिन तेंडूलकर आणि विराट कोहलीच्या उपस्थितीची. बीएमडब्ल्यू ७ सीरीज ७३० डीझेल आणि ७५० पेट्रोल कार सचिन तेंडूलकरने लाँच केल्या. या कारची किंमत १.१ कोटी रुपये आहे. सचिन तेंडूलकरने ही कार लाँच करताना तिची काही वैशिष्ट्ये सांगितली. ते ऐकून तर असे वाटले की सचिन कार प्रेझेंटरचे काम न जाणे गेली कित्येक वर्षे करीत आहे. कारबद्दल सांगताना त्याचा आत्मविश्वास इतका होता की जणू असे वाटत होते तो कार प्रेझेंटेशन नव्हे तर बॅटिंगच करीत आहे. तर तडाखेबाज फलंदाज विराट कोहली आणि प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट यांनी आर एट व्ही १० प्लस या ऑडीच्या शानदार कारचे लाँचिंग केले. या कारची किंमत तब्बल अडीच कोटी रुपये आहे.