
मुंबई : तरुण-तरुणी फेब्रुवारी महिना सुरु झाल्यावर प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डेची वाट पाहू लागतात. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे असतो पण आतापासूनच ‘गिफ्ट’ काय द्यायचे, याचा विचार तरुणाईमध्ये सुरु देखील झाला असेल. शाओमीने तरुणाई काय विचार करत आहे, हेच ओळखून नवीन ऑफर जाहीर केली आहे. विशेष म्हणजे Mi4 स्मार्टफोनबरोबर अनेक स्मार्टफोन्सवर शाओमीने ऑफर दिल्या आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त शाओमीची ऑफर्स
शाओमीने रेडमी स्मार्टफोनवरही सूट दिली आहे. रेडमी स्मार्टफोन खरेदी केल्यास २९९ रुपयांचे Mi इयरफोन मोफत मिळणार आहे. Mi4 च्या १६ जीबीच्या मॉडेलवर २ हजाराची सुट मिळणार आहे. शाओमीच्या http://www.mi.com/in/ या वेबसाईटवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत आणि वेबसाईटवरुनच तुम्ही स्मार्टफोन खरेदी करु शकता.
