जपानमध्ये निगेटीव्ह व्याजदर लागू

bank-of-japan
जपानच्या मध्यवर्ती बँकेने म्हणजे बँक ऑफ जपानने अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी निगेटीव्ह व्याजदर लांगू केले आहेत. निगेटिव्ह व्याजदर म्हणजे बँका ग्राहकांच्या ठेवीवर अथवा बचतीवर व्याज देत नाहीत तर ग्राहकांनाच बचत अथवा ठेवींसाठी व्याज भरावे लागते. जपानमध्ये सध्या हा दर मायनस ०.१ केला गेला आहे. महागाईदर २ टक्कयांवर आणणे आणि विकासशील देश त्यातही चीनसारख्या देशातील मंदीपासून आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अर्थात हा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांवर थेट परिणाम करणारा आहे. मात्र लोकांनी पैसे बचत करण्यापेक्षा ते गुंतवावेत अथवा खर्च करावेत असाच त्यामागे उद्देश आहे. जपानचा आर्थिक विकास मंदावला आहे त्यातच महागाई वाढते आहे. त्यामुळे चलनवाढीचा धोका निर्माण झाला आहे. इंधनाच्या भावातील घसरणीमुळे जागतिक वित्तीय बाजारातही चढउतार सुरू आहेत. जपानी कंपन्यांचा आत्मविश्वास त्यामुळे कमी होत आहे. त्यामुळे निगेटिव्ह व्याजदर लागू केले गेले आहेत. आक्टोबर २०१० नंतर प्रथमच जपानने कर दरात बदल केले आहेत. या निर्णयाचा परिणाम तत्काळ दिसू लागला असून जपानच्या स्टॉक मार्केटमध्ये तेजी आल्याचेही सांगितले जात आहे.