इंडियन एचएसएल कंपनीचा वाय ५०१ प्लस स्मार्टफोन

y501
इंडियन स्मार्टफोन उत्पादक कंपनी एचएसएल ने त्यांचा नवा वाय ५०१ प्लस स्मार्टफोन लाँच केला असून भक्कम स्क्रीन हे त्याचे खास वैशिष्ठ आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार या स्क्रीनने अक्रोड फोडला तरी स्क्रीनला कोणतेही नुकसान पोहोचत नाही. या स्क्रीनला कंपनीने हॅमरस्क्रीन असे नांव दिले असून त्याला १ वर्षाची रिप्लेसमेंट वॉरंटीही दिली आहे.

अन्य फिचर्समध्ये या फोनसाठी ५ इंचाच एचडीआयपीएस डिस्प्ले, १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपीचा रियर तर २ एमपीचा फ्रट कॅमेरा, अँड्राईड किटकॅट व्ही ४.४ ओएस तसेच थ्रीजी वायफाय, ब्लूटूथ, एजीपीएस, मायक्रो यूएसबी सारखी कनेक्टिव्हीटी ऑप्शन्स दिली गेली आहेत. या फोन स्नॅपडीलवर उपलब्ध असून त्याची किंमत आहे ३९९९ रूपये. हा फोन ड्युअल सिम सपोर्ट करतो.

Leave a Comment