एकाच सरळ रेषेत पाच ग्रह दुर्बिणीशिवाय दिसणार

planet
मुंबई – पाच ग्रह तुम्ही कधी एकाच सरळ रेषेत पाहिलेत का? नसतील पाहिले तर तुम्हाला पाच महत्वाचे आणि प्रकाशमान ग्रह एकाच सरळ रेषेत पाहण्याचा योग मिळणार आहे. २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान एका सरळ रेषेत आपल्या सौरमालेतील शुक्र, गुरु, मंगळ, बुध आणि शनी पाच महत्त्वाचे व प्रकाशमान ग्रह दिसणार आहेत.

तब्बल ११ वर्षांनंतर पाच ग्रह एकाच सरळ रेषेत येण्याची ही अवस्था पहायला मिळणार आहे. या आधी म्हणजेच २००५ साली अशा प्रकारचा योग आला होता. हे ग्रह पुन्हा ऑगस्टमध्ये सरळ रेषेत येणार असून त्यावेळीही हे ग्रह एकत्र पाहण्यास मिळतील. बुधवारी म्हणजे २० जानेवारीपासून खगोलनिरीक्षकांसाठी ही पर्वणी असून सकाळी ५.३० ते ५.४० दरम्यान सूर्योदयापूर्वी ऑस्ट्रेलियात हे दृश्य जास्त चांगले दिसणार आहे. गडद रात्रीच या ग्रहांची अवस्था जास्त चांगली दिसेल, त्यामुळे प्रकाशाचे प्रदूषण नसलेल्या ठिकाणी जाऊन ते पाहावे लागेल.

शुक्र आणि गुरू हे समजण्यास सहज सोपे आहेत, मंगळ लालसर रंगाचा ठिपका असेल पण तो फार प्रखर दिसणार नाही. बुध ग्रह क्षितिजाच्या खूप जवळ असल्याने तो फार कमी काळ दिसेल, कारण लगेच सूर्योदय होणार असल्याने तो थोडा काळ दर्शन देईल.

Leave a Comment