
नवी दिल्ली – नव्या वर्षात ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो-२०१६’ (सीईएस) मध्ये दक्षिण कोरियन सुप्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक निर्माती कंपनी ‘एलजी इलेक्ट्रॉनिक’ ‘फोल्डेबल डिस्प्ले’ घेऊन येणार असून ‘एलजी’चा हा ‘फोल्डेबल डिस्प्ले’ १८ इंचाचा असणार असून तो ‘ओएलईडी’ आणि ‘एलसीडी’ वर्गवारीतील असेल.
‘एलजी’ घेऊन येणार ‘फोल्डेबल डिस्प्ले’
दरम्यान, ‘एलजी’ ही ‘फोल्डेबल डिस्प्ले’ घेऊन येणारी पहिली कंपनी नाही. यापूर्वी सोनी कंपनीने सर्व प्रथम ‘सीईएस २०१०’ मध्ये ‘ओएलईडी फोल्डेबल डिस्प्ले’ दाखल केला होता. त्यानंतर सॅमसंग कंपनीने अशाच प्रकारचा फोल्डेबल डिस्प्ले ‘सीईएस २०१३’ मध्ये दाखल केला होता. मात्र, त्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती कंपनीने अद्याप तरी सुरू केलेली नाही. ‘फोल्डेबल डिस्प्ले’ सोबतच ‘एलजी’ कंपनी यंदाच्या ‘सीईएस’मध्ये १५.६ इंचाचा आणि केवळ ९८० ग्रॅम वजनाचा लॅपटॉप सादर करणार आहे. हा लॅपटॉप जगातील सर्वात हलका लॅपटॉप असेल, असा दावा देखील कंपनीकडून करण्यात आला आहे.
