
बागलकोट- एक अशी बाइक बसवेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने बनवली आहे जिचे मायलेज आहे एका लीटरमध्ये ३६० किमी. विश्वास बसणार नाही तुमचा परंतु सुरज रायकर या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने त्याच्या प्रोजेक्टसाठी अशी बाइक तयार केली आहे जी हे ड्रीम अॅव्हरेज देते.
भारतीय विद्यार्थ्याने बनविली सर्वाधिक मायलेज देणारी बाइक
त्याने ही बाइक त्याचे शिक्षक डॉ. कुप्पसाड यांच्या मार्गदर्शनाखाली बनविली. या बाईकला आयसी इंजिन आहे. ८ बॅटरी चार्जर आणि दोन चार्जिंगच्या बॅटऱ्या आहेत. ही बाइक बनविण्यासाठी सुरजला ५०,००० रुपये इतका खर्च आला. त्याने आपल्या संशोधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले. त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली आहे. त्यांनी पत्र लिहून त्याला प्रोत्साहन दिले आहे. इतकेच नव्हे तर, या बाइकचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन करायचे असेल तर सरकारकडून अर्थसाहाय्य देखील दिले जाईल असे म्हटले आहे.
