चक्क सासूला सुनेने काढले विक्रीला

mother-in-law
नवी दिल्ली- सासू सुनांमध्ये भांडणे होतात यात काही नवीन नाही परंतु सासू आणि सुनांमध्ये झालेली भांडणे जर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आली तर काय होईल. ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री करणा-या एका वेबसाइटवर ही बोली लावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर संबंधित वेबसाईटने तात्काळ ही पोस्ट हटवून टाकली.

जुन्या वस्तूंची खरेदी- विक्री करणाऱ्या एका डॉट कॉमवर सूनेने आपल्या सासूचा फोटो अपलोड केला. शिवाय फोटोसोबतच पोस्टही टाकली. या पोस्टच्या टॅगलाइनमध्ये सूनेने ‘Mother in law in Good condition’ असे लिहीले. तसेच याच्या बदल्यात तिने एका पुस्तकाची मागणी केली. या पुस्तकामुऴे आपल्या मनाला शांती मिळेल. म्हणत माझ्या सासूचा आवाज मोठा असून सतत भांडण करते. मी बनविलेल्या जेवणात काहीतरी कमी असल्याचे सांगत असते, अशी पोस्ट सूनेने टाकली.

Leave a Comment