
मुंबई: नुकताच झेडटीई या मोबाईल उत्पादक कंपनीने ब्लेड एस७ हा आपला सर्वात जबरदस्त सेल्फी स्मार्टफोन लाँच केला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर आणि ४जी सपोर्ट यासारखे अनेक वेगवेगळे फीचर असलेला स्मार्टफोन आता बाजारात दाखल झाला असून या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, याचा कॅमेरा. या स्मार्टफोनचे रिअर आणि फ्रंट हे दोन्ही कॅमेरे १३ मेगापिक्सलचे आहेत. ब्लेड एस६ चा हा स्मार्टफोन अपग्रेडेड व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी येणार? आणि याची किंमत काय असणार याविषयी काहीही माहिती देण्यात आलेली नाही.
सेल्फीप्रेमींसाठी झेडटीईने आणला जबरदस्त स्मार्टफोन
काय खास आहे ब्लेड एस७ मध्ये :
या स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले असून त्याचे रेझ्युलेशन १०८०×१९२० पिक्सल एवढे आहे. त्याचबरोबर यामध्ये १.५ GHz क्वॉड-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६१५ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि याची इंटरनल मेमरी ३२ जीबी तसेच ६४ जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते. याफोनचे दोन्ही कॅमेरे १३ मेगापिक्सलचे आहेत. हा फोन अँड्रॉईड ५.१ लॉलिपॉप बेस आहे. त्याचबरोबर ४जी, ३जी, वाय-फाय, ब्लूटूथ, माइक्रो-यूएसबी, जीपीएस देण्यात आले आहेत.
