
नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील घरगुती सोन्याचा साठा चलनात आणण्यासाठी आणलेली योजना सोने चलनीकरण योजना व सुवर्ण रोखे येत्या पाच नोव्हेंबरपासून बाजारात येणार आहेत.
५ नोव्हेंबरला बाजारात येणार सुवर्णरोखे
या दोन्ही योजनांचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. देशातील घरे व मंदिरांत अंदाजे २० हजार टन सोने पडून आहे. या सोन्याची किंमत ५ लाख ४० हजार कोटी रुपये असल्यामुळे हे सोने चलनात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत ग्राहकाला सोन्यावर व्याज देण्यात येणार आहे.
