
नवी दिल्ली- दिवाळीत आपल्या ग्राहकांना मोफत मोबाईल कॉलिंगची सुविधा देशाची सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी देणार आहे.
दिवाळीत बीएसएनएलची फ्री कॉलिंग सुविधा
ग्राहकांना यासाठी बीएसएनएलच्या लँडलाइनची जोडणी असणे गरजेचे राहणार आहे. बीएसएनलएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी आता फिक्स मोबाइल कन्वर्जेंस प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना फ्री नाईट कॉलिंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. तर मोबाईलवरील वैल्यू एडेड सेवा लँडलाइन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या सेवेंतर्गत ग्राहक आपले लँडलाइनवर येणारे कॉल मोबाईलवरही स्वीकारू शकणार आहे. बीएसएनएल आपली लँडलाइन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ४०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
