
हुवाईने त्यांचा फोर जी स्मार्टफोन एन्जॉय फाईव्ह नावाने चीनच्या बाजारात सादर केला असून त्याची रूपयांतील किंमत साधारण १०२५० रूपयांच्या दरम्यान आहे. फोनचे प्रीबुकींग सुरू झाले आहे आणि विक्री १६ आक्टोबरपासून सुरू होत आहे. अन्य देशांत हाच फोन कंपनी ऑनर फाईव्ह एक्स या नावाने सादर करणार असल्याचेही सांगितले जात आहे.
हुवाईचा एन्जॉय फाईव्ह लाँच
या फोनची बॅटरी दमदार असून ती २० तास टॉकटाईम बॅकअप व २४ दिवस स्टँडबाय बॅकअप देते. यामुळे फोन वारंवार चार्ज करण्याचे झंझट कमी होणार आहे. फोनसाठी ५ इंची एचडी स्क्रीन, अँड्राईड लॉलीपॉप ५.१, कंपनीचे स्वतःचे इमोशन यूआय ३०१ ओएस, २ जीबी रॅम, १६ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ड्युअल सिम, १३ एमपीचा रियर कॅमेरा सीएमओएस सेन्सर व एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. फ्रंट कॅमेरा ५ एमपीचा आहे.
फोरजी बरोबरच हा फोन थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, यूएसबी व अन्य कनेक्टीव्हीटी ऑप्शनना सपोर्ट करतो.
