
नवी दिल्ली- चीनी मोबाईल उत्पादक कंपनी वन प्लसने स्मार्टफोन बाजारात आपला विस्तार अधिक वाढवण्याच्या दृष्टीने ‘वन प्लस २’ हा नवा स्मार्टफोन लॉन्च केला असून हा स्मार्टफोन ११ ऑगस्टपासून भारतासह अमेरिका, चीन, कॅनडा या देशातही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्ही या स्मार्टफोनची खरेदी अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिग साईटवरुन करु शकता. भारतात या स्मार्टफोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे.
‘वन प्लस २’ स्मार्टफोन लॉंच
या स्मार्टफोनच्या कॅमे-यामध्ये नवीन फिचर्स देण्यात आले आहेत. रिझोल्यूशन मोड, टाइम लॅप्से असे अनेक फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे फोटोप्रेमींसाठी हा स्मार्टफोन नक्कीच उपयुक्त आहे.
