
नाशिक – नाशिकमध्ये महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने ऑफ-रोडर थार सीआरडीई हे मॉडेल लाँच केले. पूर्वीच्या थार पेक्षाही ही मोटार अधिक आकर्षक आणि आरामदायी असल्याचा दावा कंपनीचे अध्यक्ष प्रवीण शहा यांनी केला आहे.
महिंद्राची थार सीआरईडी लाँच
या नव्या थार सीआरडीईचे सादरीकरण कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शहा यांचे हस्तेकरण्यात आले. या थार सीआरडीईची किंमत नाशिकमध्ये ८.३ लाख रुपये असणार आहे.
