
नवी दिल्ली- ईपीएफओ ऑनलाइन पीएफ काढण्याची सुविधा येत्या तीन महिन्यांत सुरू करणार आहे. त्याचा फायदा देशभरातील ६ कोटी पीएफधारकांना होणार असून ही सुविधा सुरू झाल्यानंतर पीएफधारकांना पीएफचे पैसे काढण्यासाठी ऑनलाइनच अर्ज करता येईल आणि ही रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येणार आहे.
तीन महिन्यांत ऑनलाइन पीएफ काढण्याची सुविधा
कामगार मंत्रालयाने २४ जुलै रोजी ईपीएफओच्या कामगार विश्वस्तांची बैठक बोलावली असून या बैठकीत ऑनलाइन पीएफ काढण्याच्या सुविधेवर चर्चा होणार आहे.
सध्या सलग दोन महिने कुठेही नोकरीला नसल्याचे सांगून पीएफची सर्व रक्कम काढता येते. हा नियम बदलून वयाची ५८ वर्षे पूर्ण होईपर्यंत पीएफधारकाला त्याच्या एकूण पीएफ रकमेच्या ७५ टक्केच रक्कम काढता येण्याची तरतूद प्रस्तावित आहे.
