व्हॉट्सअॅपचे तीन नवे फीचर लॉन्च

whatsapp13
मुंबई : व्हॉट्सअॅप या इन्स्टंट मोबाईल अॅपने नव्या अपडेटमध्ये ‘मार्क अॅज अनरीड’ फीचर लॉन्च केले असून याद्वारे युझर्स कोणत्याही चॅटमधील वाचलेले मेसेज ‘अनरीड’ मार्क करु शकतात. हे फीचर एखाद्या मेलसाठी असेलल्या ऑप्शनसारखाच आहे. याशिवाय कस्टम नोटिफिकेशन सेटिंगही अपडेटमध्ये देण्यात आली आहे. एखाद्या चॅटमध्ये व्यक्तीच्या नावाखाली युझर्स कस्टमाईज्ड रिंगटोन, व्हॉल्यूम, व्हायब्रेशन लेंथ, पॉप अप नोटिफिकेशनसारख्या सेटिंग करु शकतात. नव्या नोटिफिकेशन सेटिंगमध्ये युझर्स चॅट म्यूटही करु शकतील.

‘मार्क अॅज अनरीड’ फीचरमध्ये चॅट फक्त रिसिव्हरकडे अनरीड मार्क दिसेल. मेसेज पाठवणाऱ्याकडे कोणताही बदल दिसणार नाही. जेव्हा रिसिव्हर एखादे चॅट वाचल्यानंतर जतन करुन ठेवायचं असल्यास हे फीचर काम करेल. यावेळी युझर चॅटला अनरीड मार्क करुन ठेवू शकतो.

या अपडेटमध्ये व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल्ससाठी डेटा युझेजचा पर्याय दिला आहे, जो कमी कनेक्टिव्हिटीच्या जागांवर फारच उपयोगी पडेल. याशिवाय व्हॉट्सअॅप गूगल ड्राईव्ह बॅकअप आणि रिस्टोअर ऑप्शनही पुन्हा घेऊन आलं आहे. हा ऑप्शन काही काळासाठी एप्रिलमध्ये रिलीज करण्यात आलं होतं, पण लवकरच तो हटवण्यात आला. पण वव्हॉट्सअॅपचं हे व्हर्जन सध्या गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही.

Leave a Comment