राहुल संबंधीचा गौप्यस्फोट

rahul-gandhi
राहुल गांधी यांना एकदा अमेरिकेत काही लाख डॉलर्सच्या बेकायदा रकमेसह पकडण्यात आले होते आणि त्यांच्या झडतीत त्यांच्याकडे कसली तरी पांढरी पावडर सापडली होती. त्यामुळे ते अडचणीत आले असतानाच सोनिया गांधी यांनी तेव्हा पंतप्रधान असलेल्या वाजपेयींची भेट घेतली आणि त्यांनी या बाबत काही तरी मदत करावी अशी विनंती केली. वाजपेयींनी आपले वजन वापरून राहुल गांधी यांची सुटका केली. वन मॅन आर्मी म्हणवल्या जाणार्‍या डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी काल राजस्थानात पत्रकारांशी बोलताना हा गौप्यस्फोट केला. स्वामी यांच्याकडे अशी भरपूर माहिती असते आणि ते तिच्या साह्याने अनेक मोठ्या लोकांना अडचणीत आणत असतात. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना स्वामी यांनीच जेलचा यात्रा करायला भाग पाडले आहे.

आता प्रश्‍न असा निर्माण होतो की स्वामी यांनी ही माहिती आताच का सांगावी ? राहुल गांधी मोठा नैतिक आव आणून भाजपा सरकारला अडचणीत आणण्याचा आव आणत आहेत तेव्हा त्यांचा हा नैतिक तोरा कमी व्हावा म्हणून तरी स्वामी ही माहिती उघड करीत असावेत असे दिसते. त्यांचा हेतू काहीही असो पण या नव्या महितीचा उपयोग भाजपा सरकारला होण्याची शक्यता आहे. कारण सध्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी आपल्या राज्यसभेतल्या बहुमताचा वापर करून भाजपा सरकारची कोडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी कॉंग्रेसच्या काही भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा भंडाफोड करण्याचे धोरण भाजपाने अवलंबले आहे. या धोरणात राहुल गांधी यांच्या या पांढर्‍या पावडरचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.

कॉंग्रेसने भाजपाची कोंडी करण्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. संसदेत २२ विरोधी पक्ष आहेत. एवढ्या पक्षांच्या संघटित प्रयत्नांतून भाजपाला त्रस्त करण्याचा कॉंग्रेसचा डाव होता पण २२ पैकी बहुतेक पक्षांनी या बाबत कॉंग्रेसची साथ देण्यास नकार दिला आहे. त्या पक्षाच्या नेत्यांच्या अनेक भानगडी सध्या तपासणीच्या अवस्थेत आहेत. भाजपाच्या नेत्यांनी त्यांचा वापर करून या पक्षांची नाके दाबली आहेत आणि त्यांना या भानगडी बाहेर काढण्याची धमकी दिली आहे. ही मात्र बरोबर लागू पडली आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष भाजपाला त्रस्त करण्याच्या प्रयत्नात एकाकी पडला आहे. अशा या कॉंग्रेस पक्षाला राहुला गांधींची पांढरी पावडर दाखवली तर कॉंग्रेसचेही ताबुत थंड होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment