
मुंबई- ५ बेसिस पाँइटने आयसीआयसीआयने व्याजदरात कपात केली आहे. आता व्याजदर ९.७० टक्के करण्यात आला आहे. आधी हा व्याजदर आधी ९.७५ टक्के होता. एप्रिलपासून दोन वेळा व्याजदरात कपात करण्यात आली आहे.
आयसीआयसीआयच्या व्याजदरात कपात
एप्रिलमध्ये ०.२५ टक्क्यांनी व्याजदरात कपात करुन ते ९.७५ टक्क्यांवर आणले गेले होते. २ जूनला भारतीय रिझर्व्ह बँकेनी १५ बेसिस पाँइटनी कपात केली होती. त्यावेळी रघुराम राजन यांनी बँकेनाही व्याजदरात घट करावी असे सुचवले होते. त्यानंतर एचडीएफसीने ०.१५ टक्क्यांनी कपात केली होती.
