आरबीआयकडून नोटा बदलून घेण्याच्या मुदतीत वाढ

rbi
मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेनी २००५ पूर्वीच्या नोटा बदलून घेण्याची तारीख ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत वाढविली आहे. ही मुदत ३० जून, २०१५ पर्यंत होती. २००५ पूर्वी छापण्यात आलेल्या नोटा बँकांमध्ये जाऊन बदलून घेण्यात याव्यात असा आदेश रिझर्व्ह बँकेनी काढला आहे.

महात्मा गांधींचे चित्र असलेल्या नोटा मागील १० वर्षापासून वापरामध्ये आहे. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे नोटा असणे आवश्यक असल्यामुळे रिझर्व्ह बँकेनी हा निर्णय घेतला आहे. जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आवश्यक काळजी रिझर्व्ह बँक घेणार असल्याची ग्वाही बँकेनी दिली आहे.