
लंडन- तिहार तुरुंगात असलेले सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना दिलासा मिळाला असून लंडनमधील ग्रॉसवेनर हाउस हॉटेल आणि अमेरिकेतील दोन हॉटेल्स रेउबिन बंधुंकडे तारण ठेवण्यात येतील.
“बे सहारा” सुब्रतो रॉयला रेउबिन बंधुंचा “सहारा”
या करारानुसार या तीन हॉटेलसाठी रेउबिन बंधू सहारा समुहाला ८५० दशलक्ष डॉलर्स किंवा ५,५०० कोटी रुपये कर्जावर देणार आहे. तिहारमध्ये बसून सुब्रतो यांनी रेउबिन बंधुसोबत वाटाघाटी केली. तुरुंगातून वाटाघाटी करुन निश्चित झालेला हा भारतातील सर्वात मोठा करार आहे. तिहारमधून जामीनवर बाहेर यायचे असेल तर रॉय यांना १०,००० कोटी रुपये सर्वोच्च न्यायालयाकडे जमा करावे लागणार आहेत. या तिन्ही हॉटेल्सची एकत्रित किंमत १.५५ अब्ज डॉलर आहे.
