
मुंबई : बिझनेस टू कस्टमर या पॉलिसीवर व्हॉट्सअॅप विकत घेणाऱ्या फेसबुक कंपनीने काम करण्यास सुरुवात केली असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार आहे. आजवर एसएमएसच्या माध्यमातून कंपन्यांतर्फे होणारी जाहिरात लवकरच व्हॉट्सअॅपवरूनही सुरू होणार आहे.
आता व्हॉटसअॅपवर झळकणार जाहिराती
जगभरातील किमान १२५ कोटी लोक सध्या व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर करीत आहेत. तसेच व्हॉट्सअॅप हे तंत्रज्ञान स्मार्ट फोनच्या आधारेच वापरले जाणे शक्य असल्याने यामुळे संभाव्य ग्राहकही जमा करणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात येते.
