
बीजिंग- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या पर्यटकांना ई- व्हिसा देण्याची घोषणा केली आहे.
चीनी पर्यटकांना मिळणार ई-व्हिसा
दोन्ही देश मिळून जगाच्या लोकसंख्येच्या ३३ टक्के आहेत. तरीदेखील आपल्याला एकमेकांबद्दल खूप कमी माहिती आहे. असे ते म्हणाले. २०१५ हे वर्ष भारत-चीनचे वर्ष म्हणून आपण साजरे करू असे मोदी म्हणाले. गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयामध्ये इ-व्हिसाहून वाद होता. सुरक्षेच्या कारणास्तव गृहमंत्रालयाला इ-व्हिसा देणे नकोसे वाटत होते परंतु परराष्ट्र खात्याने ही बाब लावून धरली होती. मागील वर्षी १.४ चीनी पर्यटकांनी भारताला भेट दिली होती.
