मार्क झुकरबर्गचे मोदींच्या सेल्फीला इन्स्टंट ‘लाईक’

modi2
बीजिंग : जगभरातील कोणत्याही दिग्गज नेत्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर टक्कर देतात. मोदींनी आता चीन दौऱ्यातही दिलखुलासपणे सेल्फी काढली. त्यापैकी चीनचे पंतप्रधान ली किकयांग यांच्यासोबत काढलेल्या सेल्फीला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने तातडीने लाईक केले.

सध्या चीनमध्ये नरेंद्र मोदी यांनी ली-किकयांग यांच्यासोबत काढलेल्या सेल्फीची जोरदार चर्चा आहे. जगप्रसिद्ध ‘वॉल स्ट्रीट जर्नल’सह अनेक पाश्चिमात्य देशातील मीडियाने या फोटोला सर्वात ‘शक्तीशाली सेल्फी’ असल्याचे म्हटले आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने याआधीही मोदींचे अनेक फोटो लाईक केले आहेत. मोदी फेसबुकवर अक्टिव्ह असल्याने झुकरबर्गने त्यांचे नेहमीच कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय भारताचे राजकीय नेते आहेत. मोदींचा चीन दौरा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यानंतर चीनसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर करार करण्यात यश मिळवले आहे.

Leave a Comment