१० इंजिन असलेल्या जगातील पहिल्या विमानाचे यशस्वी परीक्षण!

aircraft
न्यूयॉर्क: वर्जीनियामध्ये बॅटरीवर चालणारे जगातील पहिले १० इंजिन असलेल्या विमानाचे अमेरिकच्या अंतराळ संस्था नासाने यशस्वी परीक्षण केले आहे.
या विमानाचे ‘ग्रीस्ड लाइटनिंग-१०’ असे नाव असून हे विमान हेलिकॉप्टर सारखे जमीनीवर उड्डाण करू शकते. नासाचे एअरोस्पेस इंजीनिअर बिल फ्रेडरिक यांनी सांगितले की, आमचे पुढील लक्ष्य हेलिकॉप्टरच्या तुलनेत याला चार पट मोठे आणि उत्तम बनविण्याचे काम करतो आहे.