आयफोन टू गोल्ड हिस्टरी एडिशन- कीमत फक्त ४९ कोटी रूपये

ipad
मोबाईल क्षेत्रातील सर्व कंपन्या आपल्या कंपन्यांची विक्री वाढविण्यासाठी लो बजेट स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या स्पर्धेत गुंतल्या असताना असेही स्मार्टफोन बाजारात येत आहेत ज्यांची किंमत आपण कल्पनेतही करू शकत नाही. सर्वसामान्य असले फोन घेण्याचा विचारही करणार नाहीत मात्र अतिश्रीमंतही तो घेण्याअगोदर विचार केल्याशिवाय निर्णय घेऊ शकणार नाहीत असे हे फोन आहेत.

यातील अॅपल आयपॅड टू हे असेच एक महागडे प्रकरण आहे. अॅपल आयपॅड टू गोल्ड हिस्टरी एडिशन नावाने बाजारात असलेला हा फोन तब्बल ७८ लाख डॉलर्स म्हणजे ४९ कोटी रूपयांना मिळतो आहे. सर्वात महागड्या गॅजेटमध्ये त्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो तयार करण्यासाठी डायनोसॉरची हाडे, सोने, हिरे व अन्य मौल्यवान रत्नांचा मुक्तहस्ते वापर केला गेला आहे. हा सर्वात महाग टॅब्लेट पीसी म्हणूनही प्रसिद्धीस आला आहे. याच्या मागची बाजू २४ कॅरेट सोन्यात बनविली गेली आहे आणि त्यासाठी तब्बल दोन किलो सोने वापरले गेले आहे.

या फोनवरील अॅपलच्या लोगोत १२.५ कॅरेटचे ५३ हिरे जडविले गेले आहेत शिवाय होमचे बटण ८.५ कॅरेटच्या हिर्‍याने सजविले गेले आहे. या फोनच्या किमतीत महागड्या समजल्या जाणार्‍या बीएमडब्ल्यूच्या साधारण २४ गाड्या येऊ शकतात कारण या गाडीची किंमत आहे २ कोटी ३० लाख रूपये.