ताजमहालसमोरून जाण्यास म्हशींना बंदी

tajmahal
आग्रा -जगभरातील आणि देशातील पर्यटकांचे भारतातील मुख्य आकर्षण असलेले पर्यटनस्थळ म्हणजे आग्र्याआचा ताजमहाल. या स्थळाचे सौदर्यं कायम रहावे आणि येणार्‍या पर्यटकांना येथे येताना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून ताजमहाल समोरून म्हशी नेण्यास बंदी घातली गेली आहे. त्याचबरोबर म्हैस मालक आपली गुरे यमुनेत धुवूही शकणार नाहीत. हा नियम मोडणार्‍या म्हैस मालकांना दंड केला जाणार आहेच पण त्याचबरोबर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटकही केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ताजमहालला भेट देण्यासाठी दररोज प्रचंड संख्येने पर्यटक येत असतात. मात्र येथे जाण्याचा रस्ता गुराढोरांनी भरलेला असतो व त्यामुळे पर्यटकांना अडचणी येतात तसेच या सौंदर्यस्थळाला गालबोटही लागते. परिणामी देशाची प्रतिमा खराब होते.गेल्या आठवड्यात संसद स्थाई समितीच्या सदस्यांनी या परिसराला भेट दिली तेव्हा तेथून म्हशी जात असल्याचे त्यांना दिसले. सुप्रीम कोर्टाने या संदर्भातले आदेश मागेच दिले असूनही त्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याचे दिसल्यावर त्यांनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले.त्यामुळे ताजगंज पोलिस चौकीत म्हैस मालकांची बैठक घेण्यात आली आणि त्यांना म्हशी ताजमहालासमोरून नेणे अथवा यमुनेत धुणे यावर बंदी असल्याचे व ती मोडल्यास अटक करण्यात येईल असे बजावण्यात आले.

Leave a Comment