
मुंबई: एलजीने जी ४ या नव्या स्मार्टफोनसाठी नवे प्रोमो कॅम्पेन #TryLGG4 सुरु केले असून काही लोकांना एलजीचा जी ४ हा स्मार्टफोन या कॅम्पेनमध्ये ३० दिवसांसाठी वापरायला मिळणार आहे.
एलजीची भन्नाट शक्कल; ३० दिवस मोफत वापरा जी ४ स्मार्टफोन
एलजी इंडियाने हे नवे कॅम्पेन आपल्या ग्राहकांच्या मागणीबाबत अपेक्षा पूर्ण करण्याच्या इराद्याने लाँच केले आहे. दिवसेंदिवस मोबाइल बाजारात वाढ होत असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एलजीने नवी शक्कल लढविली आहे. जर हा फोन विकत घ्यायचा असल्यास तुम्हाला एलजीच्या वेबसाइटवर लॉग इन करा. तसेच सोशल मीडियावर शेअर केल्यास हा स्मार्टफोन जिंकण्याची संधी देखील आपल्याला मिळू शकते.
