कोसळणार नासाचे ‘मॅसेंजर’

nasa
वॉशिंग्टन : सूर्यमालेतील पहिला ग्रह असलेल्या बुधाभोवती मागील चार वर्षांपासून अधिक काळ फिरत असलेले ‘मेसेंजर’ हे यान पुढील दोन आठवड्यांत ग्रहावर कोसळणार आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ ने सोडलेल्या या यानामधील इंधन संपल्याने ते कोसळणार आहे. ‘नासा’ ने हे यान २००४ मध्ये अवकाशात सोडले होते. हे यान ३० एप्रिलला बुधाच्या पृष्ठभागावर कोसळेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. हे यान ३.९१ किलोमीटर प्रतिसेकंद या वेगाने कोसळणार आहे. मात्र, ते बुधाच्या पृथ्वीला दिसू न शकणा-या भागात कोसळणार असल्याने ही घटना शास्त्रज्ञांना पाहता येणार नाही.