
सॅमसंग ने गॅलेक्सी ए सिरीज स्मार्टफोनची श्रेणी आणखी विस्तारीत करण्याचा निर्णय घेतला असून त्यांचा ए एट स्मार्टफोन लवकरच लाँच होत असल्याचे सांगितले जात आहे. ए सेव्हनच्या नव्या अवतारात हा फोन येईल आणि तो कंपनीचा सर्वाधिक सडपातळ फोन असेल असेही समजते.
सॅमसंगचा ए एट लवकरच
सॅम मोबाईलच्या रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन कंपनीचे हायरेंज मॉडेल असेल. त्याला ५.७ इंची फुल एचडी सुपर अमोलेड स्क्रीन, १६ एमपीचा रियर कॅमेरा, सेल्फीसाठी ५ एमपीचा कॅमेरा, २ जीबी रॅम, अँड्राईड ५.० लॉलीपॉप ओएस, १६ जीबी इंटरनल मेमरी, ४ जी कनेक्टीव्हीटी अशी फिचर्स असतील असेही हा अहवाल सांगतो. या स्मार्टफोनचा थिकनेस केवळ ५.९ मिमी इतका आहे.
