नेट न्युट्रॅलिटीबाबत भेदभाव करू नये – झुकेरबर्ग

mark
कॅलिफोर्निया : सेवा पुरवठादारांनी नेट न्युट्रॅलिटी ही महत्वाची असून भेदभाव करू नये आणि मर्यादाही ठरवू नये. जे लोक अद्याप इंटरनेटवर नाहीत अशांना कोणतीही कनेक्टिव्हिटी नसण्यापेक्षा काही प्रमाणात इंटरनेटशी जोडून शेअर करण्याची काही क्षमता प्राप्त करून देणे अधिक चांगले आहे. त्यामुळेच आम्ही इंटरनेट डॉट ओआरजी कार्यक्रम राबवित आहोत’ असे फेसबुकच्या वतीने मार्क झुकेरबर्ग यांनी स्पष्ट केले आहे.

अलिकडे फेसबुकच्या वतीने थेट मार्क झुकेरबर्गला प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. मार्कने फेसबुकच्या युजर्सना आपल्या फेसबुक पोस्टद्वारे प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. त्यास युजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. जोश कोन्साईन नावाच्या युजरने नेट न्युट्रॅलिटीबाबत तसेच इंटरनेट डॉट ओआरजी बाबत विचारलेल्या प्रश्न विचारला. त्याव मार्कने नेट न्युट्रॅलिटीचे समर्थन केले आहे. तसेच सेवा पुरवठादारांनी भेदभाव करू नये आणि मर्यादाही ठरवू नये असेही म्हटले आहे. मात्र ज्या युजर्सना कोणत्याही प्रकारची इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही त्यांना इंटरनेट डॉट ओआरजीमार्फत काही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत, असेही मार्कने उत्तरात स्पष्ट केले आहे. यावेळी मार्कला विविध प्रश्न विचारण्यात आले. फेसबुकवर लवकरच टोमणा मारण्याचे बटण उपलब्ध होणार असल्याचेही मार्कने एका उत्तरात स्पष्ट केले.

Leave a Comment