गोव्यात जाहीर चुंबनावर बंदी

kissing
पणजी – सार्वजनिकरित्या चुंबन घेण्यावर गोव्यातील एका ग्रामपंचायतीने बंदी घातली असून काही जोडपी आणि सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्यात आलेले लोक जाहीरपणे चुंबन घेतात. असे ‘अश्लील कृत्य’ स्थानिक रहिवाशांना उपद्रवकारक असल्याचे सांगून या प्रकारचा ठराव ग्रामपंचायतींनी केला आहे.
अशा प्रकारचा ठराव साल्व्हाडोर डो मुंडो ग्रामपंचायतीने करून, सार्वजनिक स्थळी चुंबन घेणे व दारू पिणे, तसेच फार मोठ्याने संगीत वाजवणे यावर बंदी घातली आहे. स्थानिकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्यामुळे असा ठराव केला, असे या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच रीना फर्नांडिस यांनी सांगितले.