फेसबूकचे नवीन विश्लेषणात्मक अॅप

facebook
न्यूयॉर्क – नवीन विश्लेषणात्मक अॅप सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकने तयार केले असून या अॅपच्या निर्मात्यांना हे अॅप वापरकर्त्यांचे व्यवहार ओळखण्यात मदत होणार आहे. हे अॅप निशुक्लपणे वापरता येणार आहे. हे टूल अॅप निर्मात्यांसाठी सर्वाधिक फायदेशीर असल्याचे ‘वेंचरबीट’ यांनी म्हटले आहे. या अॅपच्या वापरकर्त्यांना कोण-कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, याची माहिती या अॅप निर्मात्यांना मिळणार आहे.

उपयोगकर्त्यांच्या ऐतिहासिक माहितीचे संकलन या अॅपमधी ‘कोहोटर्स’ या टूलद्वारे उपलब्ध करण्यात येऊ शकते. तसेच या अॅपमुळे वापरकर्त्यांची स्मरणशक्ती, जीवनर्पयत व्हॅल्यू आणि अॅपला वारंवार डाउनलोड करण्याच्या कारणांचा शोध घेण्यात निर्मात्यांना मदत मिळणार आहे. हे टूल अॅप उपयोगकर्त्यांची भौगोलिक, वय, लिंग आणि भाषा यांचीही माहिती निर्मात्यांना देऊ शकणार आहे. तर या विश्लेषणात्मक टूलद्वारे फेसबूकवरुन जाहिरातींवर क्लीक करणाऱ्यांचीही माहिती निर्मात्यांना मिळणार आहे.

Leave a Comment