
नवी दिल्ली – आपल्या प्रवाशांसाठी स्वस्तात विमान प्रवाशाची संधी स्पाईस जेटने उपलब्ध करुन दिली आहे. १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
स्पाईस जेटची ‘लेट्स गो अॅब्रॉड सेल’ योजना
‘लेट्स गो अॅब्रॉड सेल’ या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. २ हजार ६९९ रुपयांत परदेश दौरा करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तिकीट आरक्षण गरजेचे असेल. योजनेच्या नावाप्रमाणे केवळ परदेश दौऱ्याकरिताच ही योजना लागू आहे.
