येतीच्या अस्तित्वावरून दोन रिसर्च टीममध्ये वाद

yeti
वाशिंग्टन : पुन्हा एकदा येती या प्राण्यांच्या अस्तित्वाच्या मुद्यावरून मतभेद उफाळून आले असून गेल्यावर्षी अभ्यासकांना हिमालयीन येती (हिममानव) चे केस सापडले होते. रिसर्चसच्या टीमच्या मते हे केस ४० हजार वर्षे जुन्या प्रजातीतील पोलक बियरचे आहेत. तर अभ्यासकांच्या दुस-या एका टीमच्या मते, हे केस करड्या रंगाच्या अस्वलाचे आहेत. हे अस्वल साधारणपणे हिमालयात आढळतात. म्हणजेच एका अभ्यासानुसार येती ही एक अस्वलाची प्रजाती आहे. यासंदर्भात पहिला शोधनिबंध ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या ब्रायन सायक्स यांचा आहे. तर दुसरा शोधनिबंध हा यूनिव्हर्सिटी ऑफ कनसासच्या एलिसर गुतिरेजने सादर केला आहे. दोघेही त्यांच्या दाव्यांबाबत ठाम आहेत. त्यांनी केलेले विश्लेषण एका मॅग्झिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
येती, बिग फूट आणि सक्चॅक नावाने ओळखला जाणारा हा जीव जगभरासाठी हजारो वर्षांपासून एक गूढ ठरलेला आहे. नॅशनल जिऑग्राफीपासून ते डिस्कव्हरीपर्यंत अनेकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही अद्याप हे रहस्य कायम आहे. हा प्राणी नेहमी घनदाट जंगल आणि डोंगराळ भागात राहतो असे म्हटले जाते. ज्या लोकांनी हा प्राणी पाहिला आहेत ते त्याचे वर्णन धिप्पाड देह, सामान्य माणसापेक्षा लांब, पूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणावर केस असलेला, मोठे पाय असलेला, शक्तीशाली आणि एक वेगळाच वास असलेला आणि ओरडणारा असतो.

येती ही हिममानव माकडासारखा एक प्राणी असतो. नेपाळ, भारत आणि तिबेटच्या जंगली भागात त्यांची घरे आहेत. येतीला पाहण्यासंदर्भातील पहिली माहिती १९२५ मध्ये एका जर्मन फोटोग्राफरने दिली होती. अनेक नेपाळींनीही त्याला पाहिल्याचा दावा केला आहे. १९५३ मध्ये सर एडमंड हिलेरी आणि तेन्जिंग नोर्गेने माऊंट एव्हरेस्ट वर मोठ्या प्रमाणावर पायांचे ठसे आढळल्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र सर एडमंडने येती दिसल्याचे वृत्त फेटाळले होते.

२००८ मध्ये एका जपानी पर्यटकाने त्याला मोठ्या पावलांचे ठसे आढळल्याचा दावा केला होता. ते ठसे येतीच्या पायाचे असल्याचा कयास लावला जात होता. पायांचे ठसे जवळपास आठ इंचांचे होते. ते अगदी मानवी पावलांप्रमाणेच दिसत होते. २०१० मध्ये चीनच्या जंगली भागात वुडलैंड्स आढळलेल्या एका प्राण्याला तोच येती असल्याचे ठरवले गेले होते. लोकांच्या तक्रारीवरुन हा केसाळ प्राणी सिचुआन प्रांतातून पकडण्यात आला होता. स्थानिक लोक त्याला अस्वल समजत होते. माजी हेविवेट बॉक्सिंग चॅम्पियन निकोलाय व्हॅल्यूवने येतीच्या शोधासाठी एक मोहीम सुरू केली होती. पण नंतर त्यांनीही हार मान्य केली होती.

Leave a Comment