वायोचा पहिला स्मार्टफोन व्हीए १० जे लाँच

vaio
सोनीबरोबर भागीदारीत लॅपटॉप बनविणारी कंपनी वायो त्यांचा पहिलावहिला स्मार्टफोन व्हीएस १० जे घेऊन स्मार्टफोन बाजारात उतरली आहे. या फोनच्या अनलॉक्ड व्हर्जनसाठी ग्राहकांना ५१ हजार जपानी येन म्हणजे २६३५० रूपये मोजावे लागतील तर लॉक्ड व्हर्जनसाठी ४ हजार जपानी येन म्हणजे २०७० रूपये द्यावे लागणार आहेत. या फोनसह जपान टेलिरकॉम कॅरियर बी मोबाईल अनलिमिटेड डेटा देणार आहे. २० मार्चपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होत आहे.

या स्मार्टफोनसाठी ५ इंची एचडी डिस्प्ले, २ जीबी रॅम, १३ एमपी एलईडी फ्लॅशसह कॅमेरा, ५ एमपी फ्रंट कॅमेरा, अँड्राईड ५.० लॉलीपॉप ओएस, १६ जीबी इंटरनल मेमरी, कार्डच्या सहाय्याने ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा अशी फिचर्स असून सध्या हा फोन काळ्या रंगातच उपलब्ध केला गेला आहे. फोर जी, वायफाय, ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटी असलेल्या या फोनला ५०० तासांची स्टँडबाय बॅटरी आहे. गेल्या महिन्यात हा फोन तैवानमध्ये लाँच केला गेला होता.