
नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक आता आपल्या यूजर्ससाठी ‘व्हॉईस टू टेक्स्ट’ हे फिचर घेऊन येणार असून फेसबुक कंपनीने व्हॉईस ट्रान्सक्रिप्शन फिचर फेसबुक मेसेंजरमध्ये अपडेट करायला सुरुवात केल्यामुळे आवाजाच्या स्वरूपात पाठविलेला मेसेज टेक्स्टमध्ये समोरील यूजरला मिळू शकतो. फेसबुकची ही अनोखी सुविधा युजर्संना नक्कीच आवडेल यात शंका नाही. या नव्या फिचरचे स्क्रिनशॉट फेसबुकच्या मेसेजिंग अॅसण्ड प्रॉडक्टस् विभागाचे व्हॉईस प्रेसिडंट डेविड मार्कस यांनी सार्वजनिक केले आहेत. त्याच बरोबर या फिचरचा प्रयोगही फेसबुकने काही निवडक यूजर्सच्या माध्यमातून सुरू केला आहे.
कसे आहे नवे फिचर ?
आता फेसबुकवरून पाठवा ‘व्हॉईस’ मेसेज
एखाद्या यूजरने व्हॉईस मेसेज केल्यास समोरील यूजरला तो मेसेज टेक्स्टच्या स्वरूपात दिसू शकतो. उदाहरणार्थ यूजर महत्त्वाच्या कार्यक्रमात असेल तेव्हा व्हॉईस मेसेज ऐकून त्याला रिप्लाय देण्याची गरज भासणार नाही. कारण या फिचरमुळे व्हॉईस मेसेजचे रूपांतर टेक्स्टमध्ये होणार असल्याने तो मेसेज वाचणे शक्य होईल.
डेव्हिड मार्कस यांच्या माहितीनुसार हे फिचर सध्या काही ठराविक यूजर्सना उपलब्ध करून त्याचा प्रयोग केला जात आहे. मात्र, काही दिवसांतच जगभरातील सर्व फेसबुक यूजर्सना ‘व्हॉईस टू टेक्स्ट’ हे फिचर उपलब्ध करून दिले जाणार आहे.
