रेनाँची नवी लॉजी प्रथम हृतिक रोशनकडे

logy
मुंबई – रेनाँ कंपनीने त्यांच्या लॉजी या नव्या कारची पहिली डिलिव्हरी बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला दिली आहे. कंपनीने डिसेंबर 2014 मध्ये या कारचा पहिला फोटो प्रसिद्ध केला होता आणि त्यानंतर महिन्याभराने ती स्टार गिल्ड एवॉर्ड कार्यक्रमात सादर केली गेली होती.

या कारची जगभरात डासिया ब्रँडखाली विक्री केली जाते मात्र भारतात ती रेनाँ ब्रँडखाली विकली जाणार आहे. भारतीय बाजारात 2015 च्या सुरवातीला ही कार दाखल होणार असल्याचे यापूर्वीच सांगितले गेले होते. या कारच्या भारतीय बाजारपेठेसाठीच्या मॉडेलमध्ये कांही बदल केले गेले आहेत त्यामुळे कारच्या किंमतीवरही परिणाम होणार आहे असे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुमित यांनी सांगितले. ही कार डिझेल कार आहे. याच कंपनीची डस्टर ही डिझेल गाडी भारतात सुपरहिट ठरली आहे.

Leave a Comment